बाप
मागे कुठल्याश्या चॅनल वर वाघीण आणि तिची पिल्लं ह्यांच्यातील हृद्य नातं दाखवत होते, माझा मुलगा साधारण 7 -8 वर्षाचा असेल तेंव्हा पटकन म्हणाला वाघोबा आणि त्याची पिल्लं, मि म्हंटल तो वाघ नाही वाघीण आहे, पुढच्या अश्या अनेक प्रसंगात पिल्लं ही आई बरोबरच दिसायची, बालसुलभ भावनेनं त्याने विचारलं, की ह्या पिल्लांबरोबर फक्त आईच का असते, कदाचित आमच्यातील नात्यामुळे त्याच्या पचनी पडत नव्हतं की इतर प्राण्यांमध्ये पिल्लं ही फक्त आई बरोबर असतात, त्याच्या असवस्थतेची मला जाणीव झाली. मी ही अंतर्मुख झालो!
मुख्यत्वे प्राण्यांमध्ये पिल्लांचे संगोपन आईच करते, आणि नर , हो नरच प्रजोत्पादनासाठी संग करतो, आई विना पिल्लांचा निभाव लागत नाही, काही अपवाद असतील ही पण पिल्लं सक्षम होई पर्यंत सांभाळ आईच करते, प्रजोत्पादना पुरती तो मादी असते , नंतर ती असते तो आई!
नाही म्हणायला , पक्ष्यांमध्ये पिल्लांच संगोपन आई बाप दोघेही मिळून करतात.
माणसांमध्ये मात्र चित्र वेगळं असतं, कारण स्त्री पुरुष एकत्र येतात ते निव्वळ शरीर संबंधा साठी नाही, तर उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्यासाठी, सहजीवना साठी.
पूर्वीच बाप म्हंटल की आधी आठवतो तो धाक! आई इतकं प्रेम बापाच्या वाट्याला फार कमी येत, पूर्वी आई घर सांभाळायची आणि बाप अर्थार्जन करायचा आणि मुलांच्या हिश्श्याला फार कमी यायचा.
त्यामुळेच असेल कदाचित पण एक आदरयुक्त भीती मुलांच्या मनात असायची, काळ बदलला, वाढत्या गरजा बघता अर्थार्जनासाठी आणि करिअर साठी सुद्धा स्त्री बाहेर पडू लागली, आणि हळूहळू कामाची विभागणी होऊ लागली.
पूर्वी बाळाची दुपटी, लंगोट बदलणे, शी शु साफ करणे ,रात्र रात्र जागणे थोडक्यात संगोपन करणे ही फक्त स्त्री ची जबाबदारी समजली जात होती, ती अलगद पणे बापाकडे आली.
कामाची विभागणी झाली, आधी 2,तास बाबा, मग आई, त्यात मग दूध गरम करण्यापासून, डायपर बद्दलण्या पर्यंत सगळी काम बाबा कसर लागला, हो पूर्वी अहो पप्पा किंवा बाबा म्हंटल जायचं त्याची जागा "ए बाबा" ने घेतली.
कुठंतरी नकळत पणे बाबाची भावनिक गुंतवणूक वाढू लागली, म्हणजे ती पूर्वी नव्हती असे अजिबात नाही, पण सहवासाने प्रेम अजून वाढणारच ना,अर्थात ते ओघानं आलंच नाहीका? पूर्वी मुलीची पाठवणी करताना धीरोदात्तपणे अश्रूंचा बांध थोपवणार बाप, मुलाच्या जऱ्याश्या आजारपणाने हळवा होऊ लागला!
ह्यातूनच दमलेल्या बाबाची कहाणी किंबहुना व्यथा समोर आली, आणि कुठंतरी बापाच्या अंतःकरणाला वाचा फुटली, बाहेरून कितीही कठोर दिसत असला तरी त्याच्यात ही सहृदयता आहे हे प्रकर्षाने कळू लागले, पूर्वी आईच्या आडून आपल्या मागण्या बापापर्यंत पोहोचवणारी मुलं आता मोकळ्या मनाने थेट बापाशी संवाद साधू लागली, त्याच्या बरोबर दंगा करु लागली. बाप हा केवळ बाप न राहता प्रसंगी आईची भूमिका ही निभावू लागला, तिच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत ही!
माझ्या मुलाच्या मानातील प्रश्नाचं नकळत उत्तर मला मिळालं!
Comments
Post a Comment