बाप
मागे कुठल्याश्या चॅनल वर वाघीण आणि तिची पिल्लं ह्यांच्यातील हृद्य नातं दाखवत होते, माझा मुलगा साधारण 7 -8 वर्षाचा असेल तेंव्हा पटकन म्हणाला वाघोबा आणि त्याची पिल्लं, मि म्हंटल तो वाघ नाही वाघीण आहे, पुढच्या अश्या अनेक प्रसंगात पिल्लं ही आई बरोबरच दिसायची, बालसुलभ भावनेनं त्याने विचारलं, की ह्या पिल्लांबरोबर फक्त आईच का असते, कदाचित आमच्यातील नात्यामुळे त्याच्या पचनी पडत नव्हतं की इतर प्राण्यांमध्ये पिल्लं ही फक्त आई बरोबर असतात, त्याच्या असवस्थतेची मला जाणीव झाली. मी ही अंतर्मुख झालो! मुख्यत्वे प्राण्यांमध्ये पिल्लांचे संगोपन आईच करते, आणि नर , हो नरच प्रजोत्पादनासाठी संग करतो, आई विना पिल्लांचा निभाव लागत नाही, काही अपवाद असतील ही पण पिल्लं सक्षम होई पर्यंत सांभाळ आईच करते, प्रजोत्पादना पुरती तो मादी असते , नंतर ती असते तो आई! नाही म्हणायला , पक्ष्यांमध्ये पिल्लांच संगोपन आई बाप दोघेही मिळून करतात. माणसांमध्ये मात्र चित्र वेगळं असतं, कारण स्त्री पुरुष एकत्र येतात ते निव्वळ शरीर संबंधा साठी नाही, तर उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्यासाठी, सहजीवना साठी. पूर्वीच बाप म्हंटल की आधी आ...